पुणे जिल्हा : आळेफाटा बाजारात कांद्याला उच्चांकी भाव

10 किलोस 700 रुपये बाजारभाव मिळाला
बेल्हे – आळेफाटा (ता. जुन्नर) येथील उपबाजार समीतीत शुक्रवारी (दि.29) कांद्याची 10 हजार 535 पिशव्यांची आवक झाली. यात जुन्या एक नंबर कांद्यास दहा किलोस मिळाला 700 रूपये उच्चांकी बाजारभाव मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संजय काळे, उपसभापती प्रितम काळे, सचीव रुपेश कवडे व आळेफाटा येथील कार्यालय प्रमुख प्रंशात महाबरे यांनी दिली.
दरम्यान, बाजार समितीत नविन कांदा विक्रीसाठी येऊ लागल्याने कांद्याच्या बाजारभावात एका किलोमागे तीन ते चार रुपये बाजारभाव उतरला असल्याची माहिती कांदा व्यापारी सचिन डावखर, सचिन जाधव, चैतन्य कु-हाडे, शिरीष पटेल, सुनील कु-हाडे, रंगनाथ घोडेकर, युवराज खोत, संतोष गांधी, रामदास शिंदे, तान्हाजी कु-हाडे, संतोष कु-हाडे, अनिल गडगे, ज्ञानेश्वर कु-हाडे, शिवप्रसाद गोळवा यांनी दिली.
प्रतिवारीनुसार 10 किलो कांद्यास मिळालेला दर रुपयांत
एक नंबर गोळा कांदा : 550 ते 581
एक नंबर : 500 ते 550
दोन नंबर : 450 ते 500
तीन नंबर : 250 ते 425
चिंगळी कांदा : 150 ते 250





