भोर – भोर तालुक्यात शनिवारी (दि. 4) सायकाळी 4.45 पासून सुमारे दोनतास झालेल्या मुसळधार पालसाने चांगलेच झोडडून काढले.सायंकाळी 7.20 पर्यंत रीमझीम सुरुच होती. या पावासाचा शेतीच्या कामांसाठी फायदा झाला असून झुळवाफेवार टाकलेल्या भाताच्या रोपाला हा पाऊस पोषक ठरणार आल्याचे बळीराजाचे म्हणणे आहे. या पावसामुळे आंबा पिकाचे फळबागाचे नुकसान झाले असून फळबागायतदार शेतकर्यांची मात्र तारांबळ उडाल्याचे चित्र आहे. विजेचा लंपडाव ठरलेलाच गेल्या तीन दिवसांपासून शुक्रवार (दि. 7) चा अपवाद वगळता रोजच विजेचा लंपडाव सुरू आहे. आकाशात ढग जरी दिसला तरी वीज पहिली जाते. महावितरणच्या या भोंगळ कारभावर ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. या विषयाच्या अनुषंगाने आमदार संंग्राम थोपटे यांनी महावितरणने कारभार सुधारावा अन्यथा आंदोलन करावे लागेल, असा ईशारा दिला होता; मात्र महावितरण मुक्या-बाहिर्याचे सोंग करीत आहेत.