Pune District : राजगड तालुक्यात जोरदार पाऊस

विंझर – राजगड तालुक्यात दोन दिवसात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तालुक्यातील डोंगरमाथ्यावरून वाहणाऱ्या पाण्यामुळे ओढे, नाले भरभरून वाहत आहेत. राजगड तालुक्यातील अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
संततधार पावसामुळे आणि वादळवाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर, काही शेतांमध्ये पाणीसाठल्यामुळे भात वगळता इतर पिकांचे नुकसान झाले आहे. कारण खरिपाच्या हंगामासाठी हा पाऊस खूप महत्त्वाचा आहे. पुणे जिल्ह्यासह राजगड तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला असून तालुक्यातील विविध भागातही पावसाने हजेरी लावली आहे.
राजगड तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली असून, तालुक्यातील अनेक गावात ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागले आलेत. तसेच भात खाचरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून शेतकरी पाटाद्वारे पाणी शेतीमधून बाहेर काढत आहेत.
दिवसभरात राजगड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची थोडी तारांबळ उडाली असली तरी, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.





