पुणे जिल्हा : इंदापुरात आमदार दत्तात्रय भरणे यांची हॅट्रिक

इंदापूर – इंदापूर विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे एक लाख 16 हजार 857 इतकी मते घेत विजयी झाले आहेत.
तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्रजी पवार पक्षाचे उमेदवार माजी मंत्री हर्षवर्धन पाटील 97 हजार 701 व अपक्ष उमेदवार प्रवीण माने 38 हजार 58 हजार मते मिळवत पराभूत झाले आहेत. आमदार भरणे तिसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले आहेत.
निवडणुकीच्या निकालाचा अभ्यास केला तर आमदार भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांमध्ये जर निवडणुकीचा सामना झाला असता तर, हर्षवर्धन पाटीलच विजयी झाले.
मात्र अपक्ष उमेदवार प्रवीण माने यांनी तब्बल 38 हजार 58 मतदान घेतल्याने, हेच अपक्ष उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांना निवडून येण्यासाठी वरदान ठरले आहेत. अपक्ष असताना देखील तसेच पहिल्यांदा विधानसभेच्या रिंगणात उभे असताना देखील प्रवीण माने यांनी मोठी बाजी मारली आहे.





