पुणे जिल्हा : पुरंदरमधील बेलसर गावाचे ग्रामपंचायत कार्यालय जळून खाक ; सर्व कागदपत्रांची झाली राख
Updated On:

बेलसर : पुरंदर तालुक्यातील बेलसरे गावातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. बेलसरे गावात असणाऱ्या ग्रामपंचायत कार्यालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कार्यालय संपूर्णपणे जळून खाक झाल्याचे पाहायला मिळत आहे.
बेलसरगावच्या ग्रामपंचायत कार्यालयाला आग लागल्याची घटना आहे. आग लागल्याने कार्यालयात असणारे सर्व साहित्य जाळून खाक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आग एवढी भयानक होती कि त्या आगीच्या लोट सर्वदूर पसरले होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती अजून तरी समोर आली नाही.
दरम्यान, आगीचा एक व्हिडीओ समोर आला आहे त्यातून या आगीची भीषणता जाणवू शकते . तर शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.





