पौड – मुळशी तालुक्यात जाहीर झालेल्या 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीत चार ग्रामपंचायती बिनविरोध करण्यात ग्रामस्थांना यश आले आहे. यामध्ये वातुंडे, भांबर्डे, जातेडे आणि डावजे या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. तालुक्यातील 23 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 321 उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीमध्ये पाच अर्ज बाद झाले. त्यात वेगरे येथील तीन आणि डावजे, भांबर्डे येथील प्रत्येकी एक असे पाच अर्ज अवैध झाले. सरपंचपदासाठी 101 अर्ज आले होते. त्यामध्ये मूगावचा एक अर्ज बाद झाला तर सरपंचपद आणि ग्रामपंचायत सदस्यही बिनविरोध करण्यात वातुंडे, भांबर्डे, जातेडे आणि डावजे या गावांनी बाजी मारली आहे. बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती, सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पुढीलप्रमाणे : ग्रामपंचायत भांबर्डे : सरपंच श्वेता राजू मोरे, ग्रामपंचायत सदस्य दत्ताञय भाऊ दिघे, अनिता अंकुश दहिभाते, मोतीराम चंदर जाधव, कमल रामचंद्र दळवी, अंजना पांडुरंग बोडके, रूपाली देवीदास मेणे, अशोक रोकडे, जातेडे ग्रामपंचायत : सरपंच : हनुमंत दामोदर शेजवळ, ग्रामपंचायत सदस्य : किसन कुडले, गणेश कोंढेंकर, हर्षदा विलास तरडे, श्रीहरी कुडले, डावजे ग्रामपंचायत : सरपंच : सविता शिंदे, सदस्य : पप्पू मधूकर पाकिरे, लीलाबाई बुजवे, बंडू रामभाऊ जंगम, कोमल शिवाजी मानकर, अपर्णा प्रकाश मानकर, मधू कदम, सुरेश कडू. ग्रामपंचायत वातुंडे : सरपंच : समीक्षा तुषार गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य : सुरेखा मधुकर शिंदे, नामदेव शिंदे, शिवराज शिंदे, सोनाली अंकुश शिंदे, सोनाली अनिल कोकरे.