पुणे जिल्हा : शेळगावचे माजी उपसरपंच भाजपात दाखल

हर्षवर्धन पाटील यांनी केला सत्कार
इंदापूर – शेळगाव (ता. इंदापूर) ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजीराव ननवरे यांनी आपल्या सहकार्यांसह माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये इंदापूर येथे सोमवारी (दि. 18) प्रवेश केला. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी तानाजीराव ननवरे यांचा सत्कार केला.
यावेळी महेश खराडे, चंदु ननवरे, शिवाजी जगताप, हनुमंत शेरकर, पंडित ननवरे, रामचंद्र भोंग, अशोक ननवरे, राजवर्धन ननवरे, दादा शेरकर, प्रशांत भुजबळ, सोमनाथ ननवरे, मोहन ननवरे, राजेंद्र सुळ, दत्तु जगताप, सचिन पोंदकुले,
संभाजी शेरकर, संदीप शेरकर, तानाजी ननवरे, तानाजी शेरकर, बाळु जगताप, रतन ननवरे आदी उपस्थित होते. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महाराष्ट्रासह देशामध्ये भाजपचा जनाधार वेगाने वाढत असल्याचे यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले.





