Pune District : श्री गिरिजात्मजास फुलांची सजावट

लेण्याद्री – संकष्टी चतुर्थीनिमित्त अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्रीक्षेत्र लेण्याद्री (ता. जुन्नर) येथील श्री गिरीजात्मज गणपतीचे हजारो भाविकांनी दर्शन घेतले. दिवसभर भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. यानिमित्ताने श्री गिरिजात्मजाच्या मूर्तीस व मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने पहाटे 5.30 वाजता देवस्थानचे अध्यक्ष अॅड.संजय ढेकणे व विश्वस्त सदाशिव ताम्हाणे यांच्या हस्ते श्रींचा अभिषेक व महापूजा करण्यात आली. देवाचे नैवेद्याकरीता गोळेगाव येथील रोहीदास मुरलीधर बिडवई यांनी 2 कॅरेट केळी दिलीत. मंदिरात सकाळी 6.00 वाजता, दुपारी 12 वाजता व सायंकाळी 6 वाजता महाआरती करण्यात आली.
यावेळी देवस्थानचे उपाध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे, खजिनदार भगवान हांडे, विश्वस्त प्रभाकर जाधव, मच्छिंद्र शेटे, काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, जितेंद्र बिडवई, कार्यालयीन सचिव रोहीदास बिडवई, व्यवस्थापक निलेश सरजिने, कर्मचारी व गोळेगाव ग्रामस्थ तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रात्री चंद्रोदयाच्या वेळी श्रींची महाआरती करण्यात आली. श्री लेण्याद्री गणपती देवस्थानचे वतीने मंगळवारी (दि.12) अंगारकी चतुर्थी व श्रावण मासनिमित्त गणेश महायागचे आयोजन करण्यात आले आहे.





