पुणे जिल्हा : आई-वडिलांची सेवा करणारी मुले कमी

-किरणताई वळसे पाटील यांची खंत
मंचर – ज्येष्ठांचा आत्मसन्मान जपून त्यांचा सन्मान केला पाहिजे. देवाप्रमाणे आई-वडील श्रेष्ठ आहे. त्यामुळे प्रत्येकाने आई-वडिलांची सेवा करून पुण्य मिळवावे. सद्यस्थितीत आई-वडिलांची सेवा करणारी मुले कमी आहेत, अशी खंत अनुसया महिला उन्नती केंद्राच्या अध्यक्षा किरणताई वळसे पाटील यांनी व्यक्त केली.
नारोडी (ता.आंबेगाव) येथे श्री मुक्ता देवी ज्येष्ठ नागरिक संघाचा अठरावा वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमासाठी आंबेगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ भालेराव, सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर, ए.एफ.इनामदार, सखाराम भालेराव, आर. जी. हुले, मारुती भोर, सोपानराव नवले, दत्तात्रय राऊत, सरपंच मंगलताई हुले, उपसरपंच अजय हुले, रवींद्र बंगाळ ,नवनाथ हुले, संचालक भाऊसाहेब नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
नामदेव नाईक यांनी मायक्रोफोन संघास बक्षीस रूपाने दिला. आर. जी. हुले म्हणाले, ज्येष्ठ नागरिक हे विचारांचे निर्माते आहेत ,ज्येष्ठांचे विचार अनुकरणीय असतात. तसेच ज्येष्ठांच्या वयाचा मान ठेवून सन्मान दिला पाहिजे. त्यांनी श्री मुक्तादेवी नागरिक संघासाठी १०० खुर्च्या देण्याचे आश्वासन दिले. यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक नवनाथ हुले,सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भालेकर आदींची भाषणे झाली.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकारिणीतील सदस्य सुभाष हुले, रामदास हुले, महादेव गायकवाड,विठ्ठल मोरे, एकनाथ हुले, बाबुराव पिंगळे, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी तसेच श्री मुक्ता देवी ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्यकारिणी सदस्य, संचालक व सभासद व ग्रामस्थ उपस्थित होते. सोपानराव हुले यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. विठ्ठलराव पिंगळे यांनी अहवालवाचन केले. सुभाष हुले यांनी आभार मानले.





