पुणे जिल्हा : ढोल-ताशांच्या गजरात बाप्पा निरोप

कुरुळीतील भैरवनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी काढली मिरवणूक
चिंबळी : कुरुळी (ता. खेड) येथील भैरवनाथ विद्यालयाने यावर्षीच्या श्रीगणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे शालेय विद्यार्थ्यांनी पारंपरिक वाद्य ढोल लेझीम या वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून बाप्पांना भावपूर्ण निरोप दिला.
यावेळी शिक्षक संगिता भगत, भाऊसाहेब थोरात, निवृत्ती भुजाडे, सतीश नायकवाडी, कल्पना सरवदे, सुवर्णा मोरे, पुनम शिंदे, संदीप सासवडे, सरस्वती सोनवणे, ग्रीष्मा कुदळे, अशोक मिसाळ, कांता मोरे, शुभांगी चिपाडे, कांचन बेल्हेकर, लक्ष्मण करे, सरिता पवार, रसिका दौंडकर, प्रज्ञा गुरव, बाळासाहेब मुळे, संतोष भोसले, प्रदीप लोखंडे, हिरामण ढेंगळे व विद्यालयाचे मुख्याध्यापक रावसाहेब व्यवहारे व संस्थेचे संचालकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला.
श्रीगणेशाचे विसर्जन झाल्यावर खिरापतीच्या प्रसादाचे वाटप करुन श्रीगणेश विसर्जनाची सांगता करण्यात आली. तसेच चिंबळी येथील पद्मावती तरुण मंडळ राजे शिव छत्रीपती तरूण मंडळाच्या वतीने ढोल ताशांच्या
गजरात भव्य मिरवणूक काढून गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले व भैरवनाथ गणेश मित्र मंडळाच्या वतिने संगीत वाद्य लावून मिरवणूक काढण्यात आली तसेच हनुमान तरुण मंडळाच्या वतिने साध्या पद्धतीने गणेश विसर्जन करण्यात आले





