पुणे जिल्हा : राज्य, केंद्रातून भाजप हद्दपार करा

देवदत्त निकम : मंचरमध्ये हुकूमशाही सरकारचा नोंदवला निषेध
मंचर – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून संघर्ष योध्याप्रमाणे काम करत आहेत. त्यांनी पुणे ते नागपूर संघर्ष यात्रा काढून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. त्याचा राग धरून त्यांच्यावर इडी मार्फत चौकशी सुरू केली आहे.
ईडीची कारवाई राजकीय सुडापोटी सुरू असून देशात हुकूमशाही पद्धतीने सर्वांना वागणूक दिली जात आहे. त्यामुळे आपल्या सर्वांना एकत्र येऊन राज्यातून व केंद्रातून भाजप सरकार हद्दपार करायचे आहे, असे मत ग्रामीणचे कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी व्यक्त केले.
मंचर (ता. आंबेगाव) येथे दि. 1 फेब्रुवारी 2024 रोजी महाविकास आघाडीच्या वतीने आमदार रोहित पवार यांच्यावर राजकीय सूडभावनेने सरकारच्या वतीने करण्यात येणार्या ईडी चौकशी आणि कारवाईचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच शेतकरी, तरुण व सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
यावेळी कार्यकर्त्यांच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करत मंचर पिंपळगाव फाटा, छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी रोड वरून कृषी उत्पन्न बाजार समिती मंचरमधून प्रांतअधिकारी कार्यालयापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली.
यावेळी मंचर प्रांत कार्यालयात नायब तहसीलदार सचिन मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप पवळे, शिवसेना जिल्हा संघटक राजाराम बाणखेले, किसान काँग्रेसचे राजू बेंडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विनायक लोंढे यांनी केले. या आंदोलन मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब बाणखेले,
राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव चे तालुकाध्यक्ष धोंडिभाऊ भोर, शिवसेना तालुकाप्रमुख दत्ता गांजाळे, रा. काँग्रेसचे युवक अध्यक्ष डॉ. हरीश खामकर, कार्याध्यक्ष गणेश यादव, गणेश खानदेशी, अरुण बाणखेले, दादाभाऊ थोरात, विकास जाधव, विशाल वाबळे, संजय बढे कर, पुरुषोत्तम फदाले, सोमनाथ गेंगजे, गोपाळ गवारी, दिलीप थोरात, विकास गाढवे, मंगेश वाघ, विशाल वाबळे, कुंडलिक लोखंडे, डॉ. दत्ता विश्वासराव, बाजीराव अजाब, बाळासाहेब अजाब, विशाल भोर, चंद्रकांत भोर, बाबाजी भोर, किरण आगळे, राहुल बोंबे, गणेश म्हस्के यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.





