पुणे जिल्हा : माजी सरपंचावर आठ जणांचा प्राणघातक हल्ला ; आरोपींविरोधात तक्रार दाखल

शिरुर : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे माजी सरपंच रामचंद्र केशव केदारी यांना जातीवाचक शिवीगाळ करत आठ जणांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरसगाव काटा त्याठिकाणच्या नागनाथ सुपर मार्केट समोर हा हल्ला झाला आहे . यात ८ जणांनी हा हल्ला केला आहे. यातील आरोपी प्रविण भिवा गोरे, सागर भिवा गोरे, चिव्या यल्ला गोरे, भिवा अंनता गोरे, ताई बाई भिवा गोरे ,आनंदा गोरे , उमाबाई गोरे , म्हाळा गोरे सर्व रा.शिरसगावकाटा यांनी जातीवाचक शिविगाळ करत तलवार, कोयता, काठीने त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला असल्याचे सांगण्यात येत आहे.
दरम्यान , दि. २८ सप्टेंबर रोजी सांय. ५ वाजण्याच्या रामचंद्र केदाररी यांना भाऊ अतुल केदारी यांना मारहाण झाल्याचा फोन आला होता. फोनवर आप्पा तुमचे भाऊ (तात्या) यांना गावातील कँनालच्या पुला वरती काही लोकांनी खुप जास्त प्रमाणात मारहाण केली आहे. असे सांगितल्याने ते तात्काळ शेतातून निघुन कँनालच्या पुलावर गेले असता, तो पर्यंत ते मारहाण करणारे लोक त्या ठिकाणावरून निघुन गेले होतेः त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावास शिरसगाव काटा येथील दवाखान्यात नेले.
दि. २९ सप्टेंबर रोजी सकाळी माझ्या भावास मारहाण करणारे लोक प्रविण भिवा गोरे, सागर भिवा गोरे,चिव्या चल्ला गोरे व त्याच्यासोबत इतर ५ लोक असल्याचे समजल्याने त्यांच्या विरोधात रामचंद्र केदारी हे पुतण्या निशात केदारी सोबत मांडवगण फराटा येथील पोलीस चौकीस तक्रार नोंदविण्याकरिता निघाले असता त्यांच्या पुतण्याच्या मोबाईलवर गावातील तंटामुक्ती अध्यक्ष सागर भाऊसाहेब गराडे यांचा फोन आला व त्यांनी सांगितले की, तुम्ही पोलीस केस करु नका झाले प्रकाराबाबत आपण दोन्ही बाजुचे लोक गावात बसून प्रकरण मिटवून घेऊ. त्याबाबत मी तुम्हांला फोन करतो.
तेंव्हा तुम्ही ग्रामपंचायत कार्यालय येथे या असे सांगितल्याने त्यांनी पोलीस चौकीस न जाता सदरचे प्रकरण मिटवण्याच्या उद्देशाने शेतामध्ये काम करण्याकरिता निघून गेले व तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या फोनची वाट पाहू लागले. दुपारपर्यंत फोन न आल्याने पुतण्या निशात याने स्वत:हुन तंटामुक्ती अध्यक्ष यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की आज मला काम आहे. समोरची पार्टी ही आलेली नाही. हे प्रकरण आपण नंतर पाहू असे सांगितले.
शेतातील काम करून रामचंद्र केदारी हे घरी मोटारसायकल वरुन जात असताना गावातील नागनाथ सुपर मार्केटला आले असता त्या ठिकाणी सायंकाऴी ६.३० वा. दरम्यान प्रविण भिवा गोरे, सागर भिवा गोरे, चिव्या चला गोरे, यांनी त्यांना अडविले व मोटारसायकलचा हॅन्डल पकडून त्यांना जातीवाचक शिविगाळ करून तु जास्त माजलास का ?आमच्या विरोधात पोलीस चौकीला तक्रार देण्यास निघाला होता काय ? तु जर आमच्या विरोधात तक्रार दिली तर अशा जातीच्या लोकांना गावात राहून देणार नाही. आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणून प्रविण भिवा गोरे व चिव्या चल्ला गोरे यांनी तलवार काढून रामचंद्र केदारी याच्या दोन्ही हातावर व पायावर तलवारीने वार केले तसेच सागर भिवा गोरे यांने कोयत्याने पायावर वार केले.
त्यानंतर भिवा आनंदा गोरे, ताईबाई भिवा गोरे, आनंदा गोरे उमाबाई गोरे, म्हाळा गोरे हे त्या ठिकाणी आले व त्यांना परत काठीने हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली . त्यानंतर रामचंद्र केदारी यांनी जीव वाचवण्याच्या उद्देशाने नागनाथ सुपर मार्केट या दुकानात जावून दुकानाचे मालक नागेश शिवाजी शितोळे व त्याचे वडील यांना वाचवण्याबाबत विनंती केली असता त्यांनी न वाचवता दुकानाचे शटर बंद करून घेतले. त्यानंतर ते बेशुध्द होवुन खाली पडले. नंतर त्यांना त्यांचा पुतण्या निशात केदारी याने दौंड येथील पिरॅमिड हॉस्पीटल येथे अँडमिट केले. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले शिरुर विभाग शिरुर हे करत आहेत





