इच्छुकांच्या टीकेला प्रत्युत्तर राजगुरूनगर – विधानसभा निवडणुकीची लढाई मुद्याची आहे, गुद्याची नाही. निवडणूक लागल्या नाहीत विरोधकांनी अजून फॉर्मही भरला नाही, निवडणुकीच्या अगोदरच अशी शिवराळ भाषा करीत असतील तर समाजाचे काय कल्याण करणार. माझे उत्तर विकास कामातून आहे, असे प्रत्युत्तर खेड-आळंदी विधानसभेचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी इच्छुकांच्या टीकेला दिले आहे. शिवस्वराज्य यात्रेची सभा शुक्रवारी (दि. 9) संतोषनगर (वाकी, ता. खेड) येथे झाली त्यावेळी पवार गटातील इच्छुक उमेदवारांनी आमदार मोहितेंवर टीका केली होती, त्या टीकेला आमदार मोहिते यांनी शनिवाई (दि. 10) उत्तर दिले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील म्हणाले, मी रोज समाजचे काम करतो, त्यांचे प्रश्न समजून घेऊन सोडवणूक करतो. विरोधकांनी कितीही खालच्या पातळीवर टीका करुद्या, मी सयंम सोडणार नाही. माझे कार्यकर्ते संयम सोडणार नाहीत. शेवटी समाज हा माणसाची पारख करतो, आपले बोलणे, आपले वागणे, आपले विचार आणि राहणीमान या गोष्टी आपल्याला पुढे नेत असतात; मात्र विरोधकांनी जी शिवराळ भाषा केली. त्यामुळे तालुक्यात हे काय करणार याचा विचार जनता करीत आहे. त्यांची माणसे त्यांच्या समोर जी शिवराळ भाषा वापरतील यातून त्याचेच नाव कमी होणार आहे. त्यामुळे डॉ कोल्हे, जयंत पाटील हे माझ्यावरील टीकेचा नक्की विचार करतील. पाटलांच्या सभेला रोजंदारीवरेली माणसे आणली जयंत पाटील यांच्या सभेत माणसे नव्हती. आली होती ती माणसे रोजंदारीवर आणलेली होती त्यामुळे पाटील बोलायला उठल्यावर ती माणसे, महिला सभेतून निघून गेली. ज्यांच्या मागे समाज, जनता नाही त्यांनी असे बेताल वक्तव्य करू नयेत. कळमोडीचे पाणी तालुक्यातील पूर्व भागाला मिळावे यासाठी माझे प्रयत्न सात्यत्याने सुरु आहेत. तालुक्यातील पूर्व भागातील लोकांना लवकरच कळमोडीचे पाणी मिळणार आहे. मतदार यादीत माझा रोल नाही मतदार यादीत अनेक नवे दुबार आहेत, मयत असलेल्या व्यक्तींची होती ती निवडणूक आयोगाने कमी केली आहेत. यात माझा रोल नाही. निवडणूक आयोग माझ्या सांगण्यावर नाव कमी करतात नवीन घेतात हे विरोधकांचे अज्ञान आहे. विरोधकांचा अभ्यास कमी आहे. निवडणूक मतदार यादीत नावे घ्यायचे, वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे. त्यामुळे हा आरोप चुनावी जुमला आहे. ते जे बोलतात, वागतात ते आपल्या नेत्याला मान्य आहे का हे तरी विरोधकांनी तपासून पाहावे. असा टोलाही आमदार मोहितेंनी लगावला.