पुणे जिल्हा : शेतकऱ्यांसाठी दिवसा वीज देण्यासाठी प्रयत्नशील

आमदार कटके : पूर्व हवेलीत आभार दौरा, जंगी सत्कार
सोरतापवाडी : शेतकऱ्यांसाठी दिवसा बारा तास वीज देण्यासाठी सरकार स्थापन होताच ऊर्जा मंत्री यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांची ससेहोलपट थांबवण्याचा प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही आमदार माऊली कटके यांनी दिली.
शिरूर- हवेली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांनी पूर्व हवेलीतील अनेक गावात आभार घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी थेऊर, नायगाव, पेठ, कोरेगावमूळ, भवरापूर, टिळेकरवाडी खामगाव, उरुळी कांचन आदी गावांनी नवनिर्वाचित आमदार माऊली कटके यांच्या आभार दौऱ्याला भरभरून प्रतिसाद दिला. थेऊर येथे आमदार माऊली कटके यांच्या हस्ते चिंतामणी मंदिरात गणपतीची आरती करण्यात आली.
नायगावचे सरपंच अश्विनी चौधरी व पेठगावच्या सरपंच शोभा चौधरी यांच्या हस्ते माऊली कटके यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी, माजी ग्रामपंचायत सदस्य कृष्णा चौधरी, आदर्श सरपंच गणेश चौधरी, आदर्श सरपंच सूरज चौधरी, सुजित चौधरी, युवा नेते ऋषीराज चौधरी, संतोष हगवणे, यशवंत कारखान्याचे अध्यक्ष सुभाष जगताप, यशवंत कारखान्याचे संचालक संतोष कांचन, विजय चौधरी, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) युवा जिल्हाध्यक्ष अण्णा महाडिक आदी उपस्थित होते.
नायगाव, पेठ, प्रयागधाम या गावांच्या वतीने आमदार कटके यांची नायगाव येथील काळभैरवनाथ मंदिर या ठिकाणी पेढ्यांची तुला करण्यात आली. यावेळी गावोगावी आमदार माऊली कटके यांची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आमदार कटके म्हणाले की, शिरूर व हवेली तालुक्याने मला भरभरून मताच्या रुपाने प्रेम दिले असून नायगाव येथील क्रीडा आरक्षित जागेवर नायगाव, पेठ, सोरतापवाडी व प्रयागधाम या गावांसाठी क्रीडा संकुलाची मागणी सरकारकडे करणार आहे.
आरक्षित जागेत क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन दिले. पेठ येथील सरकारी दवाखाना उभारण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हवेली तालुक्याने आपल्या या भुमीपुत्राला विधानसभेत पाठविण्याचे काम केले आहे. खऱ्या अर्थाने नायगावाने टक्केवारीमध्ये एक नंबरचे मतदान दिल्याचे कटके यांनी आवर्जून नमूद केले.





