पुणे जिल्हा : श्री साईनाथ पतसंस्थेच्या सभासदांना किराणा कीटचे वाटप

मंचर – मंचर (ता.आंबेगाव) येथील सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या श्री साईनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना दीपावलीनिमित्त किराणा मालाचे कीट मान्यवरांच्या उपस्थितीत सोमवार, दि. २१ रोजी सकाळी वाटप करण्यात आले.
मंचर येथील श्री साईनाथ पतसंस्था दीपावलीनिमित्त सभासदारांना रवा, तूप, मैदा, साबण, साखर, बेसनपीठ,उटणे असे एकूण ८१९ रुपयांचे किट सुमारे १९६१ सभासदांना देणार आहे. किराणा कीट वाटपाचा शुभारंभ संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय गिरीशशेठ समदडीया यांच्या पत्नी जया समदडीया,मुलगा तन्मय समदडीया, पतसंस्थेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा, संचालक वसंतराव बाणखेले, नरेंद्र धुमाळ,राजेंद्र थोरात, नंदकुमार पडवळ, श्वेता काळे, नीलम पोखरकर, यावरआली मिर, तय्यब जमादार यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष संजय चव्हाण आणि संचालक वसंतराव बाणखेले म्हणाले, श्री साईनाथ पतसंस्था नेहमीच सभासदांच्या हितांचे निर्णय घेते. भविष्यात धार्मिक यात्रा करण्याचे नियोजन झाले आहे, साईनाथ पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप शर्मा म्हणाले, संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष स्वर्गीय गिरीशशेठ समदडीया यांनी आपल्या कुटुंबाप्रमाणे संस्थेच्या हितासाठी आपले आयुष्य खर्च केले. केवळ सभासदांचे हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पतसंस्थेची प्रगती सातत्यपूर्ण ठेवली. प्रत्येक सभासदाने संस्थे प्रति आदर व्यक्त करून संस्थेच्या हितासाठी ठेवी आणि चांगले कर्जदार देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन केले.





