Pune District : विठूनामाच्या गजरात अवघड रोटी घाट सर

तुकोबांचा पालखी सोहळा आज बारामतीत मुक्कामी
उंडवडी गळ्याची ग्रामस्थांनी केली वारकर्यांची सेवा
अमोल होले
पाटस – जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची पालखी वरवंड येथील मंगळवार (दि. 24) चा मुक्काम आपटून भक्तिमय आणि उत्साही वातावरणात रोटी घाट अवघड वाट सर करून बुधवार (दि.25) उंडवडी गवळ्याच्या (ता. बारामती) दिशेने मार्गस्थ झाली. संध्याकाळच्या पाचच्या सुमारास संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा विठ्ठल नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात दौंड तालुक्याचा निरोप घेवून बारामती तालुक्यामध्ये दाखल झाली. सायंकाळी सोहळी उंडवडी गवळ्याच्या येथील पालखी स्थळावर विसावला. गुरुवारी (दि.26) पालखी सोहळ्या बारामती शहरातील मुक्कामासाठी मार्गस्थ होईल.
संत तुकाराम महाराज यांच्या देहू ते पंढरपूर प्रवासा मधील पहिला घाट म्हणून रोटी घाटाची ओळख आहे. पाटस पासून काहीच अंतरावर असलेला रोटी घाटामध्ये संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला सहा बैल जोड्यांच्या सहाय्याने घाट पार केला. रोटी घाटामध्ये रोटीच्या ग्रामस्थां कडून पालखीमधील तुकोबांच्या पादुकांची पूजा आणि आरती करण्यात आली.
संत तुकाराम महाराज यांची पालखी देहूवरून प्रस्थान करून पंढरपूरच्या दिशेने जात असताना मंगळवारी वरवंड या ठिकाणी मुक्कामी होता. सकाळी सातच्या सुमारास वरवंडचा निरोप घेवून पालखी पाटसकडे मार्गस्थ झाली. यावेळी हातात भगव्या पताका, हातात टाळ, मृदंग, कपाळी गंध, संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल रुक्मिणी यांच्या नामाचा जयघोष करत भक्तिमय वातावरणात संत तुकाराम महाराज यांची पालखी सोहळा आणि वारकरी मार्गस्थ झाले.
दरवर्षी प्रमाणे संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा दुपारचा विसावा आणि भोजन पाटस गावामध्ये असल्याने सकाळी नाऊच्या सुमारास पालखी पाटसमध्ये दाखल झाली. यावेळी पाटसचे सरपंच तृप्ती भंडलकर, उपसरपंच व इतर मान्यवरांनी पालखीचे स्वागत केले. तसेच पाटस मधील हजारो भक्तांनी वारकर्यांचे स्वागत केले. यावेळी पालखी पाटसच्या ग्रामदैवत नागेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी आणि विसाव्यासाठी ठेवण्यात आली होती. दरम्यान पाटस आणि पाटस परिसरातील हजारो ग्रामस्थांनी संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे आणि अश्वाचे (घोडा) दर्शन घेतले.
यावेळी पाटसमधील तमाम भक्तांनी ठीक-ठिकाणी वारकरी यांना चहा, पोहे, पाणी बाटली, केळी यांचे मोफत वाटप करुन वैष्णवांची सेवा केली. तसेच वरवंड आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी वारकर्यांच्या आरोग्याची तपासणी केली. यावेळी सेवेचा वारकर्यांनी मनसोक्त लाभ घेतला. वारकरी यांच्या दुपारच्या विसाव्यामध्ये आपल्या दिंडी ठीक-ठिकाणी विसावा घेत असताना विठ्ठल-रुक्मिणी यांचे भजन, कीर्तनामध्ये मंत्रमुग्ध झाले होते, दुपारचे भोजन आणि विसावा घेवून पालखी आणि सर्व वारकरी रोटीकडे वाटचाल करत होती.
यावेळी दरवर्षी प्रमाणे पुणे सोलापूर महामार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि होमगार्ड यांनी पालखी सोहळ्याचे योग्य प्रकारे नियोजन केले होते. वारकरी यांच्या आरोग्यची तपासणी करण्यासाठी ठीक-ठिकाणी कॉम्प लावण्यात आले होते व वारकर्यांची तपासणी व वराकार्यांचे हात-पाय तेल लावून मॉलिश करुन दिली जात होती.





