शेलपिंपळगाव : विधानसभा निवडणुकीच्या आधी चाकण शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे-नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण-शिक्रापूर महामार्गावरील अतिक्रमणे उदध्वस्त करण्याचे आदेश तत्कालीन पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यावेळी ती अतिक्रमणे चाकण व एमआयडीसी परिसर वगळता इतर ठिकाणी तत्कालीन स्थानिक राज्यकर्त्यांच्या तोंडी आदेशाने काढण्यास दुजाभाव करण्यात आला होता. चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील कडाचीवाडी, रासे, भोसे, शेलपिंपळगाव व बहुळ गावच्या हद्दीतील अतिक्रमणे आजही जशीच्या तशीच दिसत असल्याने उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याची चर्चा गावगाड्यात रंगत आहे.