पळसदेव – पळसदेव गावातील मेन पेठे मध्ये भगवान चौक या ठिकाणी भर लोकवस्तीत करार पद्धतीने एअरटेल कंपनीचा मोबाईल टॉवर अंदाजे गेल्या दहा वर्षांपूर्वी उभा केलेला आहे. तो हटविण्याची मागणी मागणी होत आहे. टॉवरच्या आसपासच्या नागरिकांनी तसे निवेदन पळसदेव ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांना दिले आहे. टॉवरच्या बाजूलाच पीडीसीसी बँक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर, महावितरण ऑफिस, हॉटेल व विविध व्यापारी वर्गांची दुकाने आणि घरे आहेत. पळसदेव गावाच्या बाजूला भीमा नदीपात्र असल्याने मोठ्या प्रमाणावर पक्षांची भटकंती असून सर्वच पक्षी त्या मोबाईल टॉवरवर घरटी करून राहत आहेत. अंदाजे शंभर ते दीडशे पक्षी टॉवरवरती आहेत. नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात मासे घेऊन येऊन ते पक्षी टॉवरवर मासे खातात. तसेच ते पक्षी मोठ मोठ्याने आवाज करून ओरडतात आणि त्याचबरोबर खूप मोठ्या प्रमाणावर त्यांची विस्टा टॉवरच्या बाजुला असणार्या घरांवर व घराच्या आसपासच्या परिसरात व ओट्यावर ती विष्टा पडत आहे. त्यामुळे त्याची खूप दुर्गंधी देखील पसरत आहे. पक्षांची ती विष्टा सतत प्रत्येक पाच दहा मिनिटाला सातत्यपूर्ण पद्धतीने वरून खाली पडत असून नागरिकांना स्वतःच्या घराच्या बाहेर ओट्यावर किंवा रस्त्यावर उभा राहणे देखील अशक्य झाले आहे. या बाबत नागरिकांनी एअरटेल कंपनीच्या अधिकार्यांशी अनेक वेळा संपर्क केला असता, त्यांच्याकडून नागरिकांना उडवा उडवीची उत्तरे दिली जात आहेत. एअरटेल कंपनीचे अधिकारी जाणीवपूर्वक या बाबत वेळकाढूपणा करत आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी होणारा खेळ थांबवावा अन्यथा एअरटेल कंपनीच्या विरोधात नागरिकांनी उपोषण करण्याचा इशारा भाजपचे किरण काळे यांनी दिला आहे.