आळंदी – आळंदी, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे व भारतीय संविधानाचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, प्राचार्य दीपक मुंगसे, सामाजिक शास्त्रे विभाग प्रमुख सूर्यकांत खुडे, वर्षा काळे, निकम मॅडम, राजू सोनवणे, सावळाराम देशमुख आदी उपस्थित होते. अजित वडगावकर यांनी आपल्या मनोगतातून सर्व संत व महापुरुष यांच्या विचारांचा तसेच सर्व धर्म ग्रंथाचा अभ्यास करून या संविधानाची निर्मिती करण्यात आली. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे इत्यादी संविधनाने नागरिकांस दिले असल्याचे सांगितले. त्यानंतर दीपक मुंगसे यांनी संविधान हे सर्वांना हक्क मिळवून देणारे आहे. सर्व ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या देशाला घटनेच्या माध्यमातून दिलेला पवित्र ग्रंथ आहे, असे सांगितले. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. सूर्यकांत खुडे यांनी सूत्रसंचालन केले.