Pune District : मुख्यमंत्री फडणवीसांचे इंदापूरवर लक्ष

युवक नेते प्रवीण माने यांना भाजप ताकद पुरवणार?
इंदापूर – राज्यभर राजकारणाची समीकरणे वेगाने फिरत आहेत.यामध्ये इंदापूर तालुका देखील कमी नाही. विधानसभेला अपक्ष म्हणून लढलेले युवक नेते प्रवीण माने,मागील सहा महिन्यापासून भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतील.अशी मोठी चर्चा होती.या चर्चेला बळ मात्र,राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट घेऊन,आपल्या सोशल मीडियावरून युवक नेते प्रवीण माने यांनी फोटो शेअर केल्याने येणार्या काही दिवसातच भाजप प्रवेशाचे संकेत दिले गेले आहेत.
इंदापूर तालुक्यात नीरा नरसिंहपूर येथील लक्ष्मी नरसिंह देवस्थान हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कुलदैवत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्याच्या मातीवर, माणसांवर, जनतेवर वेगळे प्रेम मुख्यमंत्री फडणवीस यांचे आहे.
राज्यात व देशपातळीवर भाजप मजबूत होत असल्याने पुणे जिल्ह्यातील राजकीय समजल्या जाणार्या इंदापूर तालुक्यात देखील भाजप स्ट्राँग करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्यान सोनाई परिवाराचे प्रमुख दशरथ माने यांचे चिरंजीव व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती प्रवीण माने यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण दिल्याचे समजते.
भाजपला युवक नेते प्रवीण माने यांच्यासारखा तगडा युवक नेता मिळणार असल्याने आगामी येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकामध्ये इंदापूर तालुक्यात भाजप आपले वेगळे स्थान निर्माण करू शकते. येणार्या काही दिवसातच या संदर्भात इंदापूर तालुक्यात मोठ्या राजकीय घडामोडी होतील, अशी चीरणी निर्माण झाली आहेत.





