Pune District : माऊलींच्या चरणी मुख्यमंत्री लीन
Updated On:

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री ज्ञानेश्वर महाराज समाधीचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.
यावेळी आळंदी देवस्थानचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पीएआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस सहआयुक्त वसंत परदेशी, विश्वस्त योगी निरंजननाथ राजेंद्र उमाप, चैतन्य महाराज कुबीर, डॉ. भावार्थ देखणे पुरुषोत्तम पाटील, अॅड. रोहिणी पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचे पूजन करण्यात आले. तर मंदिर देवस्थानच्यावतीने मुख्यमंत्र्यांचा यावेळी तुळशीची माळ देऊन सत्कार करण्यात आला.





