कोरेगाव भीमा : शिरूर तालुका पत्रकार संरक्षण समितीची नव्याने कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शिरूर तालुकाध्यक्षपदी तळेगाव ढमढेरेचे पत्रकार मयुर भुजबळ निवड करण्यात आल्याचे समितीचे जिल्हाध्यक्ष अशोक आव्हाळे यांनी सांगितले. भुजबळ यांची अल्पकाळातील पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करीत पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या समस्या मांडून न्याय मिळून देण्यासाठी आग्रेसर राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद पत्रे व प्रदेशाध्यक्ष अनिल चौधरी यांच्या शिफारसीने नियुक्ती करण्यात आल्याचे आव्हाळे यांनी सांगितले. यावेळी आध्यात्मिक विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष जगदीश उंद्रे, भगवान खुरपे उपस्थित होते. पत्रकारितेतील उल्लेखनीय कार्याबद्दल भुजबळ यांना याआधी आदर्श पत्रकार, उकृष्ट पत्रकारिता, मानवाधिकार फाऊंडेशनचा राष्ट्रीय युवा रत्न आदी पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.