दौंड येथील कार्यक्रमात वितरण सोहळा थाटात दौंड – श्री स्वामी समर्थ सेवा संघ दौंड यांच्या वतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून दौंड वकील संघटनेचे अध्यक्ष प्रशांत गिरमकर यांना विधी क्षेत्रातील आणि त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘समर्थ पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा दौंड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. गिरमकर यांनी कायदेशीर क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल म्हणून त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक वर्षांपासून ते कायदेविषयक सल्ला आणि मदतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात म्हणून त्यांच्या योगदानाबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा संघाने त्यांचा गौरव करण्याचे ठरवले. यावेली अमोल काळे यांच्या हस्ते प्रशांत गिरमकर यांना ‘समर्थ पुरस्कार’ मिळाल्या बद्दल सत्कार करण्यात आला. काळे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे कायदेशीर क्षेत्रातील योगदानाला एक वेगळी ओळख मिळाली असून इतरांनाही सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा गिरमकर यांनी व्यक्त केली.