इंदापूर : इंदापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शैलेश देविदास पवार उर्फ बाळासाहेब ढवळे यांचेवर रात्रीच्या सुमारास कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. प्राथमिक माहितीनुसार राजकीय तसेच पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. याबाबत शैलेश देवीदास पवार (वय 45, रा. सरस्वतीनगर, इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सोमवार रात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घराचे बाहेर शिवीगाळ करण्याचा आवाज आल्याने फिर्यादीने घराचे खिडकीमधून पाहिले असता दोन पांढरे रंगाच्या चारचाकी गाड्या उभ्या होत्या व समोर चौघे उभे होते. त्यात ओळखीचे मनोज आनंदकर (पूर्ण नाव माहीत नाही, रा. वडारगल्ली, इंदापूर) व भूषण माने (पूर्ण नाव माहीत नाही, रा. राजवलीनगर, इंदापूर) व इतर दोघे अनोळखी तेथे उभे होते. त्यावेळी भूषण माने याचे हातामध्ये लोखंडी कोयता होता. यावर फिर्यादीने तुम्ही शिवीगाळ का करता? असे विचारले मनोज आनंदकर, भूषण माने व त्यांचे दोन अनोळखी साथीदार यांनी जीवे मारण्याची धमकी देऊन, अंगावर धावून येत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी त्यांचेपैकी कोणीतरी ढवळे यांच्या गळ्यातील अंदाजे दोन ते अडीच तोळे वजनाची सोन्याची चेन हिसकावली. यावेळी गोंधळ सुरू असल्याने त्यांचा चुलतभाऊ शुभम निवृत्ती पवार तसेच आइस फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगार पळत आले. त्यावेळी हल्लेखार कोयता टाकून त्याचेकडील पळुन गेले.