पुणे जिल्हा : अधिकारी असल्याची बतावणी करणार्या आरोपीला अटक

पिरंगुट : शेळकेवाडी येथील व्यावसायिकाकडे अन्न प्रशासन अधिकारी असल्याचे सांगत खंडणी मागणार्या एकाला पौड पोलिसांनी अटक केली.
राजेंद्र मोहन पाटेकर (वय 58, रा. संत तुकाराम नगर, भोसरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अशोक वागपुरी गोस्वामी (वय 31, रा. शेळकेवाडी घोटावडे) यांनी फिर्याद दिली आहे.
फिर्यादीचा स्वीट होम चा व्यवसाय आहे. सोमवारी (दि. 28) दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास आरोपीने फिर्यादीला फुड ऑफीसर असल्याची बतावणी करून मै यहाँ का फूड इन्स्पेक्टर हूं, मैने तुम्हारे कारखाने का व्हिडोओ बनाके कारवाई 6 लाख रुपये का दंड हो जाएगा, अगर ऐसा किया तो असा दम देत कारवाई नही होना चाहते तो मुझे अभी 25 हजार देना होगा, अशी कारवाई करण्याची भिती
घालुन पैशाची मागणी केली. त्यानुसार आरोपीने त्याचे सोबत आलेल्या कॅब चालकाचे मोबाईल स्कॅनरवर 24 हजार रुपये ऑनलाइन पाठवून व एक हजार रूपये रोख असे एकूण 25 हजार रुपयेची खंडणी घेऊन फसवणूक केली आहे.
पुढील तपास पोलीस हवालदार सुपे करत आहे. यातील आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर 7पेक्षा अधिक अशा प्रकारची सरकारी अधिकारी असल्याची बतावणी करून फसवणूक व खंडणी मागितल्याचे गुन्हे दाखल आहेत.





