Pune District : जीवनपटातून उलगडले अजितपर्व

बारामतीत नटराज नाट्य मंडळाचा भरगच्च उपक्रम
बारामती – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसाचे औचित्य साधत शहरातील सांस्कृतिक व सामाजिक वारसा जपणाऱ्या नटराज नाट्य कला मंडळाच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला जात आहे. यावेळी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, छायाचित्र प्रदर्शन, नाट्य महोत्सव, युवा पिढीला अभिनय क्षेत्रात संधी मिळवून देण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन केले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा जीवनपट अजितपर्वमधून उलगडण्यात आले.
मंगळवार दि.२२ रोजी नटराज नाट्य कला मंडळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ६६ व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. त्यामध्ये २६६ पिशव्या रक्त संकलित झाले. अजितपर्व अजित पवार यांचा संपूर्ण जीवनपट उलगडणारे छायाचित्रांचे प्रदर्शन नटराज नाट्य कला मंडळाच्या भवनात भरवण्यात आले. छायाचित्र प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली. छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून अजित पवारांचे विविध पैलू नागरिकांना पहावयास मिळाले.
प्रशिक्षक फिल्म ॲकॅडमीच्या सौजन्याने मोफत नाटय व चिन्नपट तंत्र प्रशिक्षण शिबीर, अभिनय प्रशिक्षण, नाटय प्रशिक्षण, चित्रपट तंत्र नाटक व चित्रपट, सिरिअलमध्ये काम करायचे आहे. शॉर्ट फिल्म, वेब सिरिअल बनवायची आहे,
अभिनयाची आवड जोपासायची आहे, त्यांच्यासाठी या शिबिराचे आयोजन केले आहे. दि. २२ ते २४ हे दोन दिवस प्रवेश विनामूल्य ठेवले आहे. दंत आरोग्य समस्या व उपाय याविषयी डॉ. सौरभ दोशी यांचे व्याख्यान आयोजित केले होते. नटराज संस्थेच्या वतीने नाट्य महोत्सवाची देखील आयोजन केले आहे.
नाट्यरसिकांसाठी मेजवाणी
(दि.८) ऑगस्ट रोजी महादेव (दि.९) कर्ण व (दि.१०) रोजी माधव हे नाटक होणार आहे. तीनही नाटकांची वेळ रात्री नऊची आहे. (दि.१४) ऑगस्ट रोजी शालेय सांस्कृतिक कार्यक्रम स्पर्धा, (दि.१५) ऑगस्ट रोजी शालेय चित्रकला स्पर्धा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ३० मीटर राष्ट्रीय ध्वज लोकार्पण सोहळा होणार असून देशभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याची माहिती नटराजचे प्रमुख किरण गुजर यांनी दिली.





