Pune District : पौड-कोळवण रस्त्यावर नांदगाव येथे पडले मोठे भगदाड

पौड : पौड-कोळवण रस्त्यावर प्र. जि. मा. 26 वर नांदगाव येथील माऊली मंगल कार्यालयाच्या शेजारी मोठे भगदाड पडले आहे. अतिशय वर्दळ असणार्या या रस्त्यावर मोठा असा खड्डा पडल्याने एखाद्या वाहनाचा अपघात होण्याची शक्यता आहे जर एखादा अपघात झाला तर याला जबाबदार कोण असा सवाल नागरिक करत आहे.
या खड्ड्याचे आसपासच्या भागातील रस्ता खचला असून वरुन रस्त्याचे डांबरीकरण केलेले आवरण फक्त शिल्लक आहे व रस्त्याचे खाली पोकळ जमीन नजरेने स्पष्ट दिसत आहे. पौड कोळवण काशिग रस्ता हा साधारण दोन वर्षांपूर्वी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आला आहे आणि अवघ्या दोनच वर्षांत जर या रस्त्यावर असे खड्डे पडले आहे.
रस्त्यावर पडलेला खड्डा लांबून दिसत नाही त्यामुळे रात्रीचे अंधारावेळी या खड्ड्यात वाहन अडकून अपघात होण्याची शक्यता आहे अपघात झाल्यानंतर बांधकाम विभाग जागे होणार आहे का असा प्रश्न नागरिकांना पडला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या खड्ड्याची पाहणी होवून त्वरित दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहे.





