पुणे जिल्हा : नीरेत ज्वेलर्सचे दुकान फोडले

लाखो रुपयांच्या चांदीच्य दागिन्यांची चोरी
तिजोरी न फुटल्याने सोन्याचे दागिने वाचले
नीरा – पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ज्वेलर्सचे दुकान फोडून दुकानातील 12 किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली आहे. येथील भरपेठे मध्ये असलेले अभिजित ज्वेलर्स हे दुकान रात्रीच्या वेळी फोटण्यात आले असून याबाबत दुकानाचे मालक विजयकुमार मैढ यांनी जेजुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
विजयकुमार यांनी सोमवारी (दि. 21) सकाळी त्यांना त्यांचे दुकान उघडे असल्याची माहिती त्यांना आयडीबीआय बँकेचे सिक्युरिटी गार्ड मारुती शिंदे यांनी दिली. यानंतर त्यांनी तिथे जाऊन पाहणी केली असता त्यांच्या दुकानाचा दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे त्यांना पाहायला मिळाले. यानंतर त्यांनी दुकानात जाऊन पाहणी केली असता त्यांच्या दुकानातील चांदीचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुकानाच्या आतील भागातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र तिजोरी फोडण्यामध्ये चोरांना यश आले नाही.
दिवाळीचा हंगाम असल्याने या दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात सोने चांदीचे दागिने विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. यातील सुमारे 12 किलो चांदीचे दागिने चोरीला गेल्याची त्याच बरोबर सीसीटिव्ही कॅमेरे व डिव्हिआर असा सुमारे 5 लाख 85 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी पोलिसात दिली आहे. पुढील तपास जेजुरीचे प्रभारी अधिकारी दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सर्जेराव पुजारी करीत आहेत.





