पुणे जिल्हा : शिरूर शहरात जुगार खेळणाऱ्यांवर ४ जणांवर गुन्हा दाखल

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर शहरातील सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी ४ जण तीन पत्ती जुगार खेळत असताना ५०५० रू. रोख रक्कम, जुगाराचे साधणाच्या मालासह मिळुन आल्याने त्यांच्यावर पोलिस अमंलदार विनोद रामनाथ काळे यांनी शिरूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद देऊन मुंबई जुगार कायदया अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर हकिकत अशी की, दि. २३ जुलै रोजी सायं ६वा.मौजे शिरूर शहरातील हददीतील सिध्दार्थनगर येथे पडक्या घराशेजारी इसम नामे १ ) प्रभाकर विठठल गव्हाणे ( वय ३९वर्ष )रा. सयदनगर, शिरूर २ ) खंडु पांडुरंग खोमणे (वय २९ वर्ष )रा. सिध्दार्थनगर, शिरूर ३ ) परमेश्वर एतवारी पंडीत ( वय ४८वर्ष ) रा. मंगलमुर्तीनगर, शिरूर ४ )
ज्ञानेश्वर उर्फ माउली पंढरीनाथ शेलार ( वय ४९वर्ष ) रा. सिध्दार्थनगर, शिरूर हे तीन पत्ती जुगार खेळत असताना रोख रक्कम, जुगाराचे साधणे असा एकुण ५०५०/- रूपयांच्या मालासह मिळुन आले आहेत. म्हणुन त्यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक टेंगळे हे करत आहे.





