राजगुरूनगर : भीमाशंकर-तळेघर-वाडा ते राजगुरूनगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.60 या रस्त्याचे सिमेंट काँक्रिट द्रुपदरीकरण प्रकल्प मंजूर झाल्यानंतर त्याचे राजपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. खेड तालुक्यातील भीमाशंकर-तळेघर-वाडा ते राजगुरूनगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.60 हा 25 गावांमधून जाणार आहे. राजगुरूनगर ते भीमाशंकर 60.25 किलोमीटर चा रस्ता असून 87 हेक्टर 3668 आर क्षेत्र संपादित होणार आहे. तर आंबेगाव तालुक्यातील एका गावातील 2 हेक्टर.4436आर क्षेत्र संपादित होणार आहे. खेड तालुक्यातील कारकुडी, खरोशी आव्हाट, वाडा, तिफनवाडी, धुवोली, शिरगाव, टोकावडे, कडधे, कान्हेवाडी बुद्रुक, मोहकल, कमान, चास, आखरवाडी, पांगरी पाडळी, सातकरस्थळ, चांडोली तर्फे खेड, वडगाव न.खेड, दरकवाडी वाळद, डेहणे, बुरसेवाडी, गुंडाळवाडी, वांजळे या गावांमधून हा नवीन रस्ता जाणार असून जमिनी संपादित होणार आहेत. खेड तालुक्यातील भीमाशंकर-तळेघर-वाडा ते राजगुरूनगर रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्र.60 हा रस्ता पूर्ण झाल्यास खेडच्या पश्चिम भागाचा मोठा विकास होणार आहे. राजगुरूनगरवरून अगदी तासाभरात श्रीक्षेत्र भीमाशंकरला जाता येणार आहे. आंबेगाव तालुक्यातून भीमाशंकरला जाणारा हा जवळचा मार्ग ठरणार असून या भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. या रस्त्याचे लवकर संपादन प्रक्रिया सुरू होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या रस्त्यातील ठळक बाबी सीएल नियुक्ती दि. 29 नोव्हेंबर 2024 3र प्रसिद्धी दिनांक 29 नोव्हेंबर 2024 राष्ट्रीय महामार्ग 60 मध्ये वांजळे, बुरसेवाडी, गुंडाळवाडी या गावांचे 3र प्रसिद्धी दि. 19 मार्च 2025 उर्वरित 22 गावांचे 3 (-) अधिसूचना क्र. 1433 (अ) प्रसिद्ध दिनांक 26 मार्च 2025 ही अधिसूचना वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्याबाबत जिल्हा महिती अधिकारी पुणे यांच्याकडे पत्र क्र. सखम/कावि/208/25 दि. 28 मार्च 2025 रोजी कळविणेत आले आहे. राष्ट्रीय महामार्ग अधीनियमानुसार एकूण 22 गावांचे संयुक्त मोजणी प्रस्ताव उपअधीक्षक भूमी अभीलेख खेड यांच्याकडे पत्र क्र. सखल/का वि/55/2025 दि. 4 एप्रिल 2025 अन्वये पाठविण्यात आले आहे. वांजळे, बुरसेवाडी, गुंडाळवाडी या गावांचे डार्फ्ट 3 नोटीफिकेशनच्या मसुद्याबाबत कार्यवाही सुरू आहे. सीएल नियुक्ती दि.29 नोव्हेंबर 2024 राष्ट्रीय महामार्ग 61 मध्ये नायफडमध्ये नायफड या गावांचे 3र प्रसिद्धी दि. 02 एप्रिल 2025 डार्फ्ट 3 नोटीफिकेशनच्या मसुद्याबाबत कार्यवाही सुरू आहे