पुणे जिल्हा । वाल्हे परिसरात 68 टक्के मतदान

वाल्हे : पुरंदर तालुक्यात राजकीय चळवळीचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणार्या वाल्हे गाव भागात विधानसभेच्या निवडणूकीसाठी एकूण 8 हजार 936 पैकी 6 हजार 95 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावल्याने 68.20 टक्के चुरशीचे मतदान झाले आहे.
यावेळी, वाल्हे गावठाण येथील केंद्र क्रमांक 371 मधून 1166 पैकी 758, केंद्र क्रमांक 372 वाल्हे गाव पवारआळी येथे 879 पैकी 554,केंद्रक्रमांक 373 वाल्हे गाव बाजारपेठे येथे 854 पैकी 503, केंद्रक्रमांक 374 सावतामाळी चौक येथे 1213 पैकी 770 मतदानाचा हक्क बजावला; केंद्रक्रमांक 375 आडाचीवाडी येथे 964 पैकी 728 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
केंद्रक्रमांक 376 कामठवाडी येथे 947 पैकी 630, केंद्रक्रमांक 377 सुकलवाडी येथे 750 पैकी 610, केंद्रक्रमांक 378 अंबाजीचीवाडी येथे 721 पैकी 538, केंद्रक्रमांक 379 वागदरवाडी येथे 642 पैकी 424, केंद्रक्रमांक 380 मोरुजीचीवाडी येथे 800 पैकी 580 मतदारराजांनी आपले मत ईव्हीएम यंत्रात बंद केल्याने सरासरी 68.20 टक्के मतदान झाले आहे.
यावेळी, निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दीपक वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली, उपनिरीक्षक शिवाजी काटे, हवालदार संदीप पवार, लक्ष्मण करडे, प्रशांत जाधव, सुनील जाधव आदी पोलीस कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.





