पुणे जिल्हा : शिरूर तालुक्यात 60 टक्के पेरण्या पूर्ण

यूरियाची कृत्रिम टंचाई ः तालुका कृषी आधिकार्यांचे दुर्लक्ष
शिरूर –शिरूर तालुक्यात या वर्षी 24 जूनपर्यंत सरासरी 123 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या 60 टक्के एवढ्या पूर्ण झाल्या आहेत. पावसाने उघडीप दिल्याने पेरण्यांची टक्केवारी आणखी वाढणार आहे. बाजरी, मूग, उडीद, मका पिकासह 2100 हेक्टरवर उसाची लागवड सोयाबीनसह कापसालाही शेतकर्यांकडून पसंती मिळाली आहे; परंतु कृषी दुकानदार हे युरिया देताना लिकिंग खते देण्याची सक्ती करत आहे.याकडे कृषी आधिकारी जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहे.
क्वालिटी कंट्रोल व कृषी विभागातील अधिकारी व्हिजिट देवून वसुली करत असल्याची चर्चा बेट भागासह तालुकाभर होत आहे. त्यामुळे लिंकिंग खते न घेता यूरिया मिळणार नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. यावर कृषी विभागाचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत आहे. कृषी विभाग ऊखळ पांढरे करून या लिकिंग खते कंपनीला पाठीशी घालत असल्याचा आरोप शेतकर्यांकडून होत आहे.
दरवर्षी शिरुर तालुक्यात जून महिन्यात पावसाची सरासरी 90 मिमी एवढी असते; परंतु, यावर्षीं मात्र सरासरी बाढून 123 मिमी पाऊस पडला असल्याचे तालुका कृषी अधिकारी सिद्धेश ढवळे यांनी सांगितले. मागील वर्षी पावसाची सरासरी कमीच होती. त्यामुळे खरिपाच्या पेरण्यांना फटका बसून त्या 58 टक्के एवढ्याच झाल्या. या वर्षी मात्र पावसाची सरासरी जास्त असल्याने पेरण्यांची टक्केवारी वाढून ती 60 टक्के पेक्षा पुढे गेली आहे. जूनअखेर तालुक्यात बाजरी 6840 हेक्टर, 5078 हेक्टर मूग, 223 हेक्टर उडीद, 422 हेक्टर पेरणी झाली असून 2100 हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. तसेच 2100 हेक्टर सोयाबीन, 300 हेक्टर कापूस यांचीही पेरणी करण्यात आली आहे.
अद्यापही पेरण्या सुरू असल्याने खरीप हंगामातील पेरण्यांची टक्केवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. तालुक्यात जून अखेर पाच गावांमध्ये अद्यापही पाण्याचे 17 टँकर चालू असून दोन गावांतील पाण्याचे टँकर बंद करण्यात आले आहेत.
यावर्षी सरासरी पाऊस चांगल्या प्रकारे पडलेला आहे. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकर्यांची आपल्या शेतात्त उत्कृष्ठ प्रकारच्या बियाणांची निवड पेरणी करावी. सध्या पावसाने उघडीप दिल्याने उर्वरीत पेरण्याही करुन घ्याव्यात, परिसरातील कृषी सेवकांचे मार्गदर्शन घ्यावे.
-सिद्धेश ढवळे, तालुका कृषी अधिकारी, शिरूर





