वाल्हे (प्रतिनिधी) : भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाल्हे (ता.पुरंदर) येथील डोंबारी समाज्याच्या ८० गरजू कुटुंबांना जवळपास २ क्विंटल शिधा तसेच साबणांने वाटप करण्यात आले. यावेळी पुरंदर भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सचिन लंबाते यांच्या हस्ते येथील मोलमजुरी करून उदरनिर्वाह, करणाऱ्या गरजू कुटुंबांना आवश्यक्तेनुसार गहू,तांदूळ तसेच साबणाचे वाटप हे शोशल डीस्टंसिंग प्रणालीचे अवलंब करून करण्यात आले. यावेळी वाल्हे पोलिस ठाण्यात कर्तव्य निभावत असलेले पोलिस हवालदार हनुमंत गार्डी यांचा सन्मान सचिन लंबाते यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी भाजपच्या कार्यकर्त्या ॲड. सरला तिवारी, कांतीलाल पवार, समदास राऊत, सचिन दोशी,सागर बारवकर आदी उपस्थित होते. यावेळी शासकीय नियमांचे उल्लंघन होऊ नये याकरिता वाल्हे पोलिस ठाण्यातील हवालदार हनुमंत गार्डी यांनी चोख बंदोबस्त ठेवला.