बारामती | झारगडवाडीत सरपंच निवडीत कोरोना नियमांची पायमल्ली

Updated On:
बारामती | झारगडवाडीत सरपंच निवडीत कोरोना नियमांची पायमल्ली

डोर्लेवाडी ( प्रतिनिधी ) : बारामती तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तालुक्यात गेल्या चोवीस तासात तब्बल 45 रुग्ण आढळले असून यामध्ये शहरात 30 तर तालुक्यात ग्रामीण मध्ये 15 रुग्ण आढळून आले आहेत. असे असताना बारामती तालुक्यातील झारगडवाडीतील सरपंच निवडीत नवनिर्वाचित सरपंच आणि पॅनल प्रमुखांकडून कोरोनाची पायमल्ली सुरू आहे.

आज झालेल्या निवडीनंतर महिला सरपंच, सदस्य आणि पदाधिकारी यांना कोरोनाचा विसर पडलाय यामुळे अश्या सरपंच सदस्याकडून गावातील नागरिकांनी काय संदेश घ्यायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावेळी नवनिर्वाचित सरपंच वैशाली मासाळ, उपसरपंच सोनाली चव्हाण, पूनम आवटे, वैष्णव बळी, अनिता जाधव, सोनाली करे, पदमनाथ निकम, नारायण कोळेकर, दयाराम महाडिक, पोपट निकम, राजेंद्र बोरकर, सुखदेव निकम, आप्पासो साळुंके, रमेश बोरकर, सतीश कुलाळ, नितीन मासाळ, नितीन शेडगे, आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आता कोरोनाची पायमल्ली करणाऱ्या महिला सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी यांच्यावर पोलिस काय कारवाई करणार हे पहावे लागणार आहे.

आणखी संबंधित बातम्या

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

2026-10-05 12:29:01

Sunetra Pawar: 'दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावं'; श्री मयुरेश्वराच्या चरणी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे साकडं

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

2026-10-05 12:22:50

Baramati: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; 51 हजारांचा मुद्देमाल लंपास

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

2026-10-04 19:35:02

Baramati News : बारामती भूलतज्ज्ञ संघटनेचा राज्यस्तरावर गौरव; सार्वजनिक आरोग्य जनजागृतीसाठी राज्यात द्वितीय पुरस्कार

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

2026-10-04 11:24:34

Baramati Crime News: बाबुर्डी दुहेरी हत्याकांडाचा सात दिवसांत छडा; चुलत नातूच निघाला मारेकरी

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती

2026-10-03 12:02:53

Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बारामती दौऱ्याच्या तारखेत बदल; शरद पवारांनी दिली माहिती