यंदा पाऊस कमी; गुढी पाडव्यानिमित्त पंचांग वाचन

दावडी  -दावडी (ता. खेड) येथे रुढी परंपरे नुसार गुढी पाडव्यानिमित्त गुढी वाचन करण्यात आले. पंचांगानुसार यावेळी पाऊस कमी पडणार असून उपलब्ध पाणी जपून वापरा असा निकष काढण्यात आला. या गुढी पंचागणाचे पूजन खेड तालुका पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष व दावडी गावचे पोलीस पाटील आत्माराम डुंबरे यांच्या हस्ते करण्यात आले. गुढी वाचन नंदकुमार भदे यांच्या हस्ते करण्यात आले.

पंचांगानुसार यावेळी पाऊस कमी राहील व पाणी जपून वापरा असे सांगण्यात आले. यावर्षी ज्येष्ठ, आषाढ व श्रावण या महिन्यात पाऊस चांगला राहील. मेघाधिप शनि असल्याने अल्प वृष्टी होऊन धान्य, फुले, फळे कमी पिकतील. रोगराई आणि चोरांपासून लोकांना त्रास होईल, असे गुढी वाचनात समोर आले आहे.

या गुढी वाचन कार्यक्रमात दावडीच्या यात्रेचे व पालखीचे नियोजन करण्यात आले. यावेळी खेड तालुका पोलिस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष व दावडी गावचे पोलिस पाटील आत्माराम डुंबरे, सरपंच संतोष गव्हाणे, उपसरपंच हिरामण खेसे,  दावडी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.