पुणे –पुणे ते दौंड आणि बारामती ते दौंड मार्गावर धावणाऱ्या मेमूच्या एका फेरीचा विस्तार 11 एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यामुळे आता बारामती ते पुणे मार्गावर प्रवास करणे सोयीचे होणार आहे. येत्या सोमवारपासून (11 एप्रिल) पुणे ते दौंड मेमू (01531) आता बारामतीपर्यंत धावणार आहे. ही मेमू पुण्याहून 6.45 वाजता सुटणार असून, रात्री 9.50 वाजता बारामती येथे दाखल होणार आहे. तर बारामती ते दौंड मेमू (01528) पुणे स्थानकापर्यंत धावणार आहे. ही मेमू बारामतीहून दुपारी 4.50 वाजता सुटणार असून, पुण्यात 7.53 वाजता पोहोचणार आहे. याचबरोबर पुणे-कोल्हापुर-पुणे एक्स्प्रेसची सेवा देखील 15 एप्रिलपासून सुरू होणार आहे. पुण्याहून सकाळी 10.50 वाजता एक्स्प्रेस सुटून सायंकाळी 7.30 वाजता कोल्हापूरात पोहोचणार आहे. तर कोल्हापूरहून सकाळी 5.30 ला सुटणारी एक्स्प्रेस दुपारी 1.35 वाजता पुण्यात दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.