Pune : राज ठाकरेंच्या सभांना गर्दी, मात्र मते मिळवण्यात अपयश

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांसह महापालिका निवडणूक आघाडीने एकत्र लढवाव्यात, अशी माझी इच्छा आहे. तसेच महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल, असे वाटत नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात व्यक्त केले. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर बोलताना ते म्हणाले, राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होत असली तरी त्याचे मतात परिवर्तन होत नाही.
शरद पवार यांनी शनिवारी माध्यम प्रतिनिधीशी अनौपचारिक चर्चा केली. पुण्यातील पक्षाची जबाबदारी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांंच्याकडे दिल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यासह सर्व ठिकाणी महाविकास आघाडीने एकत्र लढावे, अशी इच्छा व्यक्त करून ते म्हणाले की, पुण्यात भाजप १०५ जागांसाठी आग्रही असली तरी भाजप कधीही टोकाची भूमिका घेत नाही.
पुण्यासह राज्यात महायुतीत जागा वाटप व्यवस्थित होईल, असे चित्र सध्या दिसत नसल्याचेही त्यांनी सांगितले. राज ठाकरे यांच्या सभांना गर्दी होते. मात्र, त्याचे मतात परिवर्तन होत नाही.
दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या सभांमध्ये होणार्या गर्दीचे मतात परिवर्तन करण्यात त्यांना यश येते असल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यात दिवसभर शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर पवार यांनी हे वक्तव्य केले.




