Pune Crime : लोणीकाळभोर परिसरातील माईल्सस्टोन हॉटेलजवळ दहशत माजवणाऱ्या दोन सराईत आरोपींना खंडणी विरोधी पथक २, गुन्हे शाखा, पुणे शहर (Pune Crime) यांनी धाडसी कारवाई करत शस्त्रांसह अटक केली आहे. या कारवाईमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांवर पोलिसांनी वचक बसवला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. १८ एप्रिल ते २४ एप्रिल २०२६ या कालावधीत अवैध अग्निशस्त्र व शस्त्र जप्तीविरोधात विशेष मोहीम राबविण्याचे आदेश वरिष्ठांकडून देण्यात आले होते. त्यानुसार खंडणी विरोधी पथक २ चे अधिकारी व अंमलदार मांजरी पोलीस ठाण्याच्या (Pune Crime) हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे लोणी काळभोर गुन्हा रजिस्टर क्रमांक १६६/२०२६ (भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५), ३५२, ३५१(२)(३), ३(५) व महाराष्ट्र पोलीस ॲक्ट कलम ३७(१) सह १३५) मधील फरार आरोपी प्रणवराज सुनील यादव (वय २५, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) व त्याचा साथीदार जय गणेश शेलार (वय २५, रा. हडपसर, पुणे) हे मांजरी ग्रीन अॅनेक्स परिसरात धारदार शस्त्रांसह असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. Pune Crime प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक राम राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तत्काळ सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून दोन लोखंडी तलवारी, दोन सुरे आणि एक कोयता असा एकूण सुमारे ३,५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई (Pune Crime) पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सह पोलीस आयुक्त (गुन्हे २) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सदर कामगिरीत पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखीले, पोलीस हवालदार घावटे, कुसाळकर, आढारी, महाजन, राऊत, शेख, परीट, राक्षे तसेच पोलीस शिपाई पाटील, खराडे, खरात आणि शिंदे यांनी सहभाग घेतला.