प्रभात वृत्तसेवा पुणे – मोटारीच्या आरशाला धक्का लागल्याच्या कारणावरुन दुचाकीवरील शिक्षकाला चालकाने बेदम मारहाण केली. याबाबत किरण केशव कुट्टे ( ३५, रा. खराडी, नगर रस्ता) यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीनुसर कुट्टे हे खासगी शिकवणी घेतात. ते वर्गात निघाले असता मोटारीच्या आरशाला दुचाकीचा धक्का लागल्याने माझ्याकडे का बघतो ?, अशी विचारणा करत चालाकने त्यांना शिवीगाळ केली. मोटारीतील तरुणीनेही शिवीगाळ केली. कुट्टे यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केला. त्यानंतर मोटार चालक पसार झाला. पसार मोटार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक निरीक्षक गोडसे तपास करत आहेत.