Pune Crime : कोकेनची विक्री करणाऱ्या नायजेरियनला अटक; 5 लाख 30 हजारांचे कोकेन जप्त

अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

पुणे – घरातून कोेकेन अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या नायजेरियन तरूणाला अमली विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५ लाख ३० हजार रूपये किंमतीचे ५३ ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. ओलमाईड किस्तोफर  कायोदे  (वय ४२, रा. वडाचीवाडी, मूळ-नायजेरिया) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

उंड्री वडाचीवाडी परिसरातील एका फ्लॅटमध्ये नायजेरियन तरूण राहत असून तो चोरून कोेकेनची विक्री करीत असल्याची माहिती पोलीस अमलदार योगेश मोहिते यांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचून ओलमाईडला ताब्यात घेतले.

त्याच्याकडे ५ लाख ३० हजार रूपये किंमतीचे ५३ ग्रॅम कोकेन आढळून आले. त्याच्याविरूद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, प्रवीण शिर्के, सुजीत वाडेकर, संदीप जाधव, राहूल जोशी, विशाल शिंदे, विशाल दळवी, मारूती पारधी, प्रवीण उत्तेकर, मनोज साळुंके, नितीन जाधव, पांडुरंग पवार, संदेश काकडे, योगेश मोहिते, रूबी अब्राहम, रेहना शेख यांच्या पथकाने केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.