अंमली पदार्थाचे उत्पादन घेणाऱ्या फर्म मालकाला 6 महिने साध्या कैदेची शिक्षा

पुणे  – परवाना नसतानाही अंमली पदार्थाचे उत्पादन घेणाऱ्या फर्म मालकाला सहा महिने साध्या कैदेची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. याबरोबरच त्याला आणि फर्मला प्रत्येकी 5 हजार रुपये दंड सुनावण्यात आला आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिना कारावास भोगावा लागेल, असे मुख्य न्यायदंडाधिकारी ए.डी.पळसपगार यांनी आदेशात नमुद केले आहे.

डॉ. नागेश सिताराम दाबके असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. याबाबत अंमली पदार्थ निरीक्षक रमेश उरूणकर यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी वकील हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार तपासले. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस हवालदार जी.आर.जायभाय यांनी मदत केली. परवाना नसताना फिर्यादी त्याच्या फर्ममधून अंमली पदार्थाचे उत्पादन करत असून, ते अमेरिकेतील एका कंपनीला विकत असल्याची माहिती फिर्यादींना 5 मे 2003 रोजी मिळाली.

त्यानुसार त्यांनी सहकाऱ्यासह 7 मे रोजी त्या कंपनीची पाहणी केली. त्यावेळी त्यांना अंमली पदार्थाचे उत्पादन आढळले. ते त्यांनी तपासणीसाठी मुंबई येथील ड्रग्ज कंट्रोल लॅबोटरी येथे पाठविले. ते अंमली पदार्थ (ड्रग्ज) असल्याचा अभिप्राय तपासणी करून देण्यात आला. त्यानंतर फिर्यादींनी याबाबत न्यायालयात खटला दाखल केला. सरकारी पक्षाने दिलेला पुरावा आणि ऍड. मेंडकी यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने याबाबतचा आदेश केला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.