Pune Crime : शरिरसंबंधासाठी दिला व्हाॅट्सअॅप नंबर; नग्न अवस्थेतील व्हिडीओ काॅल रेकाॅर्डिंग करून उकळले 18000
Updated On:

पुणे – शहरात सेक्स्टॉर्शनचे प्रकार वाढीला लागले आहे. तरूणाची बदनामी करण्याच्या बहाण्याने सायबर गुन्हेगारांनी 18 हजारांची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 29 जानेवारी ते 27 जून दरम्यान ऑलनाईन माध्यमाद्वारे घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीबरोबर तरूणी असल्याची ओळख दाखवून त्याला शरिरसंबध ठेवण्यासाठी संपर्क साधला. त्यानंतर फिर्यादी तरूणाच्या व्हॉट्सअप नंबर घेऊन त्यावर व्हिडीओ कॉल करून त्याचा नग्न अवस्थेतील व्हिडीओ स्क्रिन रेकॉर्डींग करून तो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच ते रेकॉर्डींग डिलीट करण्यासाठी गुगल पेवर 18 हजार रूपये खंडणी स्वरूपात पाठविण्यास सांगितले.
आरोपींनी अठरा हजारची खंडणी उकळल्यानंतर तरूणाने सायबर पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर खंडणी व आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





