Pune Crime News : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणारा सराईत गजाआड; दोन पिस्तुलासह मॅगझीन, काडतुसे जप्त

पुणे : दहशत माजविण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या सराईतला पर्वती पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल, चार मॅगझीन, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
ओंकार दीपक जाधव ( २२, रा. साईसिद्धी चौक, आंबेगाव पठार, धनकवडी) असे अटक करण्यात आलेल्या सराईताचे नाव आहे. पर्वती भागात पाेलीस कर्मचाीर महेश मंडलीक, सद्दाम शेख गस्त घालत होते. त्यावेळी जाधव याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीची दोन पिस्तूल, चार मॅगझीन, दोन काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. जाधव याने पिस्तूल काेणाकडून आणले ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पर्वती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर, उपनिरीक्षक किरण पवार, प्रकाश मरगजे, महेश मंडलिक,सद्दाम शेख, सूर्या जाधव, अमित चिव्हे, अमोल दबडे, श्रीकात शिंदे, मनोज बनसोडे यांनी ही कामगिरी केली.




