Pune Crime News : पिस्तूलसह पेट्रोलपंपाजवळ उभ्या असलेल्या तरुणास अटक

पुणे :- भारती विद्यापीठ पोलिसांनी भिलारेवाडी येथे पेट्रोल पंपाजवळ पिस्तूल घेऊन थांबलेल्या तरुणास अटक केली. त्याच्या ताब्यातून पिस्तूल आणि तीन जीवंत काडतूसे हस्तगत करण्यात आली. आरोपी मुळचा मध्य प्रदेशातील असून तो शिरवळ येथे एका खासगी कंपनीत काम करतो.
सतिश गुलाबराव शेरके (23, रा. सध्या शिंदेवाडी, शिरवळ, ता. खंडाळा, जि. सातारा, मुळ जि. छिंदवाडा, मध्यप्रदेश) असे अटक आरोपीचे नाव आहे. भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक गणेशात्सवाच्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार मंगेश पवार व निलेश खैरमोडे यांना खबर मिळाली की,कात्रज घाटातील भिलारेवाडी येथील पेट्रोल पंपाच्या समोरील बाजुस एक तरुण पिस्टल कमरेला लावुन थांबला आहे. त्यानूसार तपास पथकाने तेथे धाव घेऊन सतिश गुलाबराव शेरके याला ताब्यात घेतले.
त्याची झाडाझडती घेतली असता, त्याचे ताब्यात एक 40 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व 600 रुपये किंमतीचे 3 जिवंत काडतुसांसह सापडली. त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनूसार कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील,सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे)विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंमलदार मंगेश पवार, निलेश खैरमोडे, सचिन सरपाले, चेतन गोरे, महेश बारावकर, शैलेश साठे, निलेश ढमढेरे, अवधतु जमदाडे, अभिजीत जाधव, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, हर्षल शिंदे, आशिष गायकवाड, अभिनय चौधरी, राहुल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली आहे.





