Pune Crime: मोबाईल चोरांना लष्कर पोलिसांकडून अटक; चोरीचा मुद्देमाल हस्तगत

पुणे – मोबाईल विक्री करणाऱ्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या चौघांना लष्कर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. यातील एक आरोपी सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
शाहरूख सलाउद्यीन खतीब (२४, रा. कोंढवा), सलिम हसन शेख ( २४ ), सर्फराज पाशा शेख (२२ ) आणि अजीम बबलु शेख ( २०, तीघेही रा. कासेवाडी, भवानीपेठ) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यातील शाहरुखवर घरफोडीचे पाच गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, न्यु मोदीखाना येथील सेल एक्सप्रेस दुकानात ३ डिसेंबर रोजी चोरी झाली होती. दुकान रात्री बंद असताना आरोपींनी शटर उचकटून वनप्लस व ओपो कंपनीचे दहा मोबाईल चोरले होते.
याप्रकरणी लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास करताना पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातुन आरोपींचा माग काढला. तेव्हा हा गुन्हा सराईत गुन्हेगार शाहरुख याने साथीदारांच्या मदतीने केल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्याचा तपास पोलीस उप-निरिक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दिपक निकम यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरिषकुमार दिघावकर, पोलीस निरिक्षक (गुन्हे) प्रदीप पवार, उप निरिक्षक राहुल घाडगे, यांचे नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार महेश कदम, सोमनाथ बनसोडे, संदिप उकिर्डे, रमेश चौधर, सचिन मांजरे, लोकेश कदम, हराळ, कोडिलकर, अल्का ब्राम्हणे यांनी केली.





