Pune Crime | विश्वासघात करून सोन्याचे दागिन्यांचा अपहार केलेल्या कारागीरास पुणे पोलिसांकडून 36 तासात अटक; 28 लाखाचे दागिने जप्त

पुणे – रविवार पेठेतील सराफी व्यापाऱ्याचा विश्वासघात करुन, सोन्याचे दागिन्यांचा अपहार
केलेल्या कारागीर आरोपीस फरासखाना पोलीसांकडुन ३६ तासाचे आत अटक
करण्यात आले, त्याचेकडुन २८,५२,५७१/- (अठ्ठावीस लाख बावन्न हजार पाचशे एकाहत्तर )
रुपये किंमतीचे ५९८.५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०००/- रुपये किंमतीचा १
मोबाईल फोन जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक २५/०४/२०२१ रोजी फिर्यादी मनोज इंद्रजीत मन्ना, (वय ३६ वर्ष, व्यवसाय- सोने, चांदीचे दागिने पॉलिश करणे, रा. १४७० कसबा पेठ, माहेश्वरी बालाजी मंदीरासमोर, पुणे, मुळ गाव सिबोरा, ठाणा दासपुर, जिल्हा पश्चिम मिदनापुर, पश्चिम
बंगाल) यांचे दुकानातील कारागीर मशीदुल ऊर्फे मैदुल लालचंद (शेख,वय ३२ वर्षे,
रा. सध्या रविवार पेठ, भोहरी आळी, पुणे, मुळ गाव सांगीपाडा, शेखवाडा, जि.हुगळी,
पश्चिम बंगाल) याने त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांचेकडुन ३५,८०,००० रुपये किंमतीचे ७५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पॉलिश करण्यासाठी घेतले.
ते दागिने त्यांना पॉलिश करुन न देता, त्या सोन्याचे दागिन्यांचा अपहार करुन दिनांक २६/०४/२०२१ रोजीचे पहाटे ०३.०० वा. ते ०६.०० वा चे दरम्यान निघुन गेला़ फिर्यादी यांनी तक्रार दिल्याने फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला़ दरम्यान
फरासखाना पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी अभिजीत
पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, व त्यांचे अधिपत्याखालील पोलीस स्टाफने दाखल गुन्हयातील आरोपी मशीदुल ऊर्फे मैदुल लालचंद शेख याचा शोध घेत असताना
सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील यांना खबर मिळाली की, गुन्हयातील आरोपी मशीदुल ऊर्फे मैदुल लालचंद शेख, हा दौंड रेल्वे स्टेशनजवळ थांबला असुन, तो पश्चिम बंगाल येथे पळुन जाण्याच्या तयारीत आहे.
त्यानुसार फरासखाना पोलीस स्टेशनकडील पोलीस अधिकारी व पोलीस स्टाफ यांनी
दौंड रेल्वे स्टेशन येथे जावुन शोध घेतला असता तो दिनांक २८/०४/२०२१ रोजी १०.०५ वा. दौंड रेल्वे स्टेशनयेथील दुर्गामाता मंदीरा समोरील रोडवर मिळुन आला त्यास ताब्यात घेवुन जागीच त्याचेकडुन २८,५२,५७१ रुपये किंमतीचे ५९८.५९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व ५०००/- रुपये किंमतीचा १ मोबाईल फोन, पंचासमक्ष पंचनाम्याने जप्त करुन त्यास
अटक करण्यात आली.
ही कारवाई .अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग डाॅ.संजय शिंदे, . पोलीस उप आयुक्त परिमंडळ-१ डॉ. प्रियंका नारनवरे सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग पुणे . सतिश गोवेकर यांचे मार्गदर्शनाखाली राजेंद्र लांडगे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरासखाना पोलीस स्टेशन ), राजेश तटकरे, (पोलीस निरीक्षक, गुन्हे), , अभिजीत पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक, अजितकुमार पाटील, पोलीस उप निरीक्षक पोलीस अंमलदार रिजवान जिनेडी, मेहबुब मोकाशी, सयाजी चव्हाण, शरद वाकसे वैभव स्वामी, महंमद हनीफ शौकत शेख, मोहन दळवी, सचिन सरपाले, आकाश वाल्मीकी, राकेश क्षीरसागर, मयुर भोकरे, अभिनय चौधरी, ऋषीकेश दिघे, अमोल सरडे, महावीर वलटे, यांच्या पथकाने केली आहे.





