पुणे – एक्साईज विभागात असिस्टंट कमिशनर असल्याचे खाेटे सांगुन एका भामटयाने व महिलेने दारुचे दुकानाचे लायसन्स काढून देण्याचे बहाण्याने साेलापूर जिल्हयातील माळशिरस येथील व्यवसायिकाची तब्बल ५८ लाखांची फसवणुक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पाेलीस ठाण्यात आराेपीं विराेधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माळशिरस येथील ३९ वर्षीय व्यवसायिकाने पाेलीसांकडे एक इसम व महिले विराेधात फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे. सदर आराेपी यांनी संगनमत करुन व्यवसायिकाला एक्साईज विभागात असिस्टंट कमीशनर असल्याचे खाेटे सांगत बनावट आयडी कार्ड दाखवले.
व्यवसायिकास एफ.ए,-२ दारुचे दुकानाचे लायसन्स काढून देताे असे त्यांनी सांगुन मार्च २०२० पासून आतापर्यंत वेळाेवेळी पुण्यातील वेगवेगळया ठिकाणी आणि बँक ट्रान्सफरद्वारे ५८ लाख रुपये स्विकारले. त्याबदल्यात आराेपींनी व्यवसायिकाला दारुचे दुचाकाने लायसन्स निघाल्याचे खाेटे कागदपत्रे दाखवुन त्यांची फसवणुक केली आहे. याबाबत सहाय्यक पाेलीस निरीक्षक आर.गायकवाड पुढील तपास करत आहे.