Pune Crime : एटीएम मशिनची तोडफोड करत चोरीचा प्रयत्न
Updated On:

पुणे – नगर रोड चांदेरे कॉम्पलेक्स येथील एसबीआय बँकेच्या एटीएम सेंटरमधील मशीनची तोडफोड करून चोरी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मागील आठवड्यात पहाटे सव्वा दोनच्या सुमारास घडली.
याप्रकरणी, बँकेचे चॅनल मॅनेजर फॅसिलिटेर यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





