प्रभात वृत्तसेवा पुणे – मद्यपी संगणक अभियंता हॉटेलच्या पार्किंगमध्ये कार मागे घेत असताना एकाचा गाडी आणि भिंतीमध्ये दबून मृत्यू झाला. ही घटना कल्याणीनगर येथील टॉईट बारमध्ये रविवारी दुपारी अडीचच्या सुमारास घडली. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.सत्येंद्र मंडल असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी संगणक अभियंता प्रतापसिंग धाईंगडे (५०) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धाईंगडने बारमध्ये भरपूर मद्यपान केल्यावर कर्मचाऱ्यांनी त्याला मद्य नाकारले. यानंतर तो बारमधून बाहेर पडून पार्किंगमधून कार मागे घेत होता. यावेळी कार पार्किंगचा फलक आणि भिंतीला जोरात धडकली. यामध्ये गंभीर जखमी होऊन मंडल याचा मृत्यू झाला