Pune Crime : अल्पवयीन मुलाच्या डोक्यात फोडली बिअरची बाटली; दोघांना अटक
Updated On:

पुणे – सिगारेट आणून न दिल्याने अल्पवयीन मुलाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडण्यात आली. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात 19 वर्षीय दोघांना अटक करण्यात आली आहे.
दीपक गायकवाड (19, रा.जनता वसाहत) आणि अजय आखाडे (19, रा.धायरी) अशी आरोपींची नावे आहेत. फिर्यादी रमन पवार यांचा 16 वर्षीय मुलगा तेथून कामानिमित्त चालला होता. तो घरामागच्या गल्लीतून जाताना त्याला आरोपी तेथे मद्यप्राशन करताना दिसले.
त्यांनी मुलाला सिगारेट आणण्यास सांगितली. मात्र, त्याने नकार दिला. दरम्यान आरोपींनी त्याला घराबाहेर बोलावत सिगारेट न आणण्याचा जाब विचारुन डोक्यात बिअरची बाटली फोडली. तपास पोलीस उपनिरीक्षक खेडकर करत आहेत.





